Admission
image
JANSEVA SAMITI SANCHALIT

Shri. M. D. Shah Mahila College of Arts & Commerce

श्री एम. डी. शाह महिला महाविद्यालय कला आणि वाणिज्य

An Autonomous Institution

An Autonomous InstitutionRecognised Under Section 2(f) & 12(B) of UGC, Affiliated to S. N. D. T. Women's University, Mumbai
Accredited 'A' Grade with CGPA- 3.04 (4th Cycle) by NAAC
IMC RBNQA - Performance Excellence Trophy

ISO 21001 : 2018 - Educational Organisation

ISO 50001 : 2018 - Energy Management System

ISO 14001 : 2015 - Environmental Management System

Department Of Marathi

Career Opportunities

  • शिक्षक , प्राध्यापक  होण्याची प्रचंड  संधी : महाराष्ट्रातील प्रत्येक प्राथमिक , माध्यमिक शाळांमध्ये व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये मराठी विषय असतोच . या ठिकाणी काम करण्याची खूप संधी आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात , गोवा , मध्यप्रेदश , दिव दमन इत्यादी राज्यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या खूप मोठी आहे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत देखील शासनाने मराठी विषय सक्तीचा केलेला आहे . त्यामुळे जास्तीत जास्त संधी मराठी विषयाला मिळते. प्राथमिक, माध्यमिक , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक प्राध्यापक म्हणून काम करण्याची खूप मोठी संधी आहे 
  • स्पर्धा परीक्षा : परीक्षार्थीसाठी मराठी विषय हे वरदानच आहे., कारण ‘एमपीएससी’ परीक्षेत याचा मोठा फायदा होतो. पीएसआय, एसटीआय या पदांसाठीच्या मुख्य परीक्षेत एकूण २५ टक्के अभ्यासक्रम हा मराठी व्याकरणाचा असतो. तर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, क्लार्क, मंत्रालय सहाय्यक या व इतर अनेक पदांसाठी जी परीक्षा होते, त्या प्रत्येक परीक्षेत मराठी विषय असतो. तर ‘यूपीएससी’ला ही ‘मराठी’ विषय निवडून परीक्षा देण्याचा पर्याय आहे. केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोग : एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी आणि अन्य स्पर्धा परीक्षांध्येही मराठी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत 300 गुणांचा द्वितीय भाषेचा पेपर म्हणून मराठी विषय निवडता येतो, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतही मराठी भाषा महत्त्वाची ठरते. मुख्य परीक्षेत निबंधलेखन, उतार्‍यावरील प्रश्‍न, व्याकरण आदी घटकांवर आधारित 100 गुणांचा पेपर असतो. याशिवाय अन्य स्पर्धा परीक्षांमध्येही मराठी भाषा विषय निर्णायक ठरू शकतो.
  • प्रसारमाध्यमे :  प्रसारमाध्यमांमध्ये मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज असते. त्यामुळे वृत्तपत्र, नियतकालिक, आकाशवाणी, दूरदर्शन विविध इथे मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी असते. ज्यामध्ये बातमी लेखक, संवादक, निवेदक. संकलक, संपादक अशी विविध पदे असतात.
  • साहित्य-समीक्षा (सर्जनशील लेखन) : प्रतिभा, विद्वत्ता आणि त्याला सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड मिळाल्यास कसदार साहित्यनिर्मिती घडू शकते. कविता, नाटक, कादंबरी, कथा, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र यांसारख्या सृजनशील लेखनाकडे अलीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आहे. पुस्तकपरीक्षण, नाट्यपरीक्षण, चित्रपटसमीक्षा, साहित्यसमीक्षा, व्याकरण, कोशनिर्मिती, ह्यासारख्या लेखनातून करियरच्या नव्या वाटा सापडू शकतात. भाषिक क्षमतेसोबतच नवनिर्मितीची क्षमता असणार्‍यांनी या क्षेत्राचा व्यवसाय म्हणून नक्की विचार करावा.
  • दुभाषिक आणि ​भाषांतरकार :​ मराठी सोबत इतर एखादी भाषा शिकून तुम्ही दुभाषिक म्हणून काम करू शकता. शासकीय कार्यालयापासून ते खासगी कंपनी पर्यंत या नोकऱ्या उपलब्ध असतात. तर अनुवाद हा देखील त्याचाच एक भाग एखादी गोष्ट इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेतून मराठी मध्ये आणणारे, दर्जेदार आणि अचूक मराठी लिहिणारे, भाषांतर करणारे अनुवादक ही काळाची गरज बनली आहे. भाषांतर, अनुवाद : जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून विविध भाषा-संस्कृती यांचा परिचय होऊ लागला. अन्य भाषांमध्ये निर्माण होणारे ज्ञान स्वभाषेत उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा वाचक आणि लेखक यांना असणे स्वाभाविक आहे. भाषांतर आणि अनुवादासाठी अथांग भांडार आज मराठी भाषेसमोर उभे आहे.
  • डबिं​ग : भाषांतराप्रमाणेच हे देखील काम त्याच स्वरूपाचे असते. ज्यामध्ये एखाद्या कलाकृतीचे अन्य भाषेतून मराठी रूपांतर करायचे असत. मग ते कार्टून असो, चित्रपट किंवा हल्लीच्या वेबसिरीज. तुमचे जर भाषेवर प्रभुत्व असेल, तुमच्याकडे आवाजाचे वेगळेपण असले तर डबिंगचे पायाभूत शिक्षण घेऊन तुम्ही उत्तमी पैसे कमावू शकता. कारण हल्ली अनेक मोठ्या कलाकृती मराठी रूपांतरित केल्या जात आहे.
  • मुद्रितशोधन आणि डीटीपी : एखाद्या मजकुराला व्याकरणाच्या चौकटीत बसवण्याचे आणि त्याला उत्तम शब्दांची जोड देणे ते काम मुद्रित शोधकाचे असते. आज माध्यमे, प्रकाशनसंस्था यामध्ये मुद्रितशोधकांना मोठी संधी आहे. यासोबतच ‘डीटीपी’ चा कोर्स केला तर लिहिलेला मजकूर टाईप करून त्याला डिजिटली सजवण्याचे कसबही आपल्याकडे येते. असे कौशल्य प्राप्त झाल्याने आपण घरबसल्या काम करून उत्तम कामी करू शकतो. सध्या मुद्रितशोधन आणि डीटीपी यांचा एका पानाला ८० ते १२० रुपयांचा दर दिला जातो.
  • चित्रपट, मालि​का : आजही मराठी चित्रपट, वेबसिरीज, मालिका यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे यासाठी मराठी लेखकांची गरज असते. भाषेतून शिक्षण घेतल्याने आपल्या सृजनशक्तीचाहि विकास होतो, ज्यामुळे आपण लेखक होऊ शकतो. त्यातूनच पुढे पटकथा, संवाद, गीतलेखक अशा अनेक संधी मनोरंजन क्षेत्रात मिळतात.
  • संगणक आणि मराठी : संगणकाने मानवी जीवन व्यापून टाकले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. मराठीत टंकलेखन करण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. वृत्तपत्रे, नियतकालिके, शासकीय दस्तावेज, शैक्षणिक साहित्य यांपासून एम.फिल, पीएच.डी प्रबंधांचे टंकलेखन अलीकडे संगणकावर करून त्यात हवा तसा बदलही करता येतो. महाजालावरील मराठी संकेतस्थळांच्या निर्मितीसाठीही मराठी टंकलेखन व अन्य कौशल्ये महत्त्वाची ठरतात. संगणक व मराठी यांचे उत्तम ज्ञान असल्यास हा अर्थार्जनाचा चांगला स्त्रोत आहे.

            मराठी भाषेतून शिक्षण घेऊन आपण ‘कन्टेन्ट रायटर’ होऊ शकतो. ज्यामध्ये अनेक डिजिटल माध्यमे, पोर्टल यासाठी आशय निर्मिती म्हणजे लेख, बातम्या, संहिता यांचे लेखन करू शकतो. अनेक शासकीय नोकऱ्या, कला विभाग, भाषा विभाग येथे संधी असते. तसेच स्वतःचे ब्लॉग लिहून, मुक्त पद्धतीची पत्रकारिता करून, लेख लिहूनही आपण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो. याशिवाय भाषेमध्ये ‘पीएचडी’ करून संशोषक, अभ्यासक म्हणूनही आपल्याला विविध पदे भूषवता येतात. तसेच भाषेवर प्रभुत्व मिळवल्याने निवेदक, मुलाखतकार होता येते. तुमच्याकडे वेगळं कौशल्य असेल तर याच भाषेत आशय निर्मिती करून यूट्यूबर होणे हा देखील पर्याय उपलब्ध झाला आहे.