About the Subject
कोणत्याही भाषेचा त्या भाषेतील साहित्याचा अभ्यास हा त्या विशिष्ट समाजाची त्या समाजातील जीवन मूल्यांची ओळख करून घेण्याची प्रक्रिया असते. त्या प्रमाणे मराठी भाषा , साहित्याचा अभ्यास हा मराठी जीवन , भारतीय समाज जीवन समजून घेण्याची व्यवस्था आहे . यातूनच समग्र जीवनाचा वेध घेता येतो. मराठीच्या अभ्यासातून असाच मानवी जीवनाचा वेध घेता घेता स्वतःचे जीवन समृद्ध करता येते.
About the Department
मराठी विभाग १९९२ साली 'पूरक मराठी ' ( ए सी मराठी ) विषयास मान्यता घेऊन सुरु करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार १९९४ साली मुख्य मराठी विषय सुरु करण्यात आला. पदवीधर होणाऱ्या दुसऱ्या तुकडीतील कु.चंचल जाधव हिने विद्यापीठात विशेष श्रेणी सह सुवर्ण पदक हि पटकावले आणि विभागाचा नाव लौकिक वाढविला . त्याच बरोबर नयना जाधव , सविता वास्टर , पूजा पराडकर अशा विद्यार्थिनी विद्यापीठाचे सुवर्ण पदक पटकावले आहे .
विभागात अध्ययन अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पूरक विविध उपक्रम राबविले जातात. त्यातील काही ठळक उपक्रम म्हणजे महर्षी कर्वे व्याख्यानमाला , विविध स्थळ भेटी , शैक्षणिक सहली , मान्यवरांची व्याख्याने , परिसंवाद आणि कार्य शाळाचे आयोजन , विद्यार्थिनी दत्तक योजना आणि संवाद समन्वय असे विविध उपक्रम राबविले जातात . लेखन गुणांना प्रोत्साहन देणारे बिंजकूर व कौशल्य विकासास प्राधान्य देणारा मोडी लिपीचा वर्ग हे आमचे विशेष आहेत